पाण्याची मोटार चोरणाऱ्या चोरास, काही तासातच मेहुनबारे पोलीसांनी केले जेरबंद.

पाण्याची मोटार चोरणाऱ्या चोरास, काही तासातच मेहुनबारे पोलीसांनी केले जेरबंद.
उपसंपादक कल्पेश महाले (चाळिसगाव)
चाळीसगांव सह मेहुंनबारे परिसरात शेतकऱ्याची शेतीसाठी अत्यावश्यक संसाधने, उपकरणे, चोरीचे प्रमाण दिवसंदिवस वाढतच आहे. यावर पोलिसांनी चांगलाच गोपिनिय छडा लावला होता.
दिनांक २५ फेब्रुवारी रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास शिरसगाव, तळोंदा येथून शेतातील विहिरीतून पाण्याच्या इलेक्ट्रिक मोटर चोरी करून ओमनी गाडीत टाकून फरार झाले होते. त्याबाबत मेहुनबारे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
वाढत्या चोरीचा छडा लावण्यासाठी मेहूनबारे पोलिसांकडून निरनिराळे डावपेच आखले जात होते.आरोपींचे शोध घेण्यासाठी, व रंगेहाथ पकडण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, चाळीसगाव, उपविभागीय अधिकारी श्री.अभयसिंग देशमुख चाळीसगाव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.संदीप परदेशी यांचे सोबत पोलीस हवालदार अशोक राठोड, गोरख चकोर, निलेश लोहार, राकेश काळे सह पोलीस पथक आरोपी शोधकामी रवाना झाले होते.
गोपनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे संशयित आरोपी हे कजगाव, भोरटेक भडगाव तालुक्यातील असलेबाबत माहिती मिळाली होती. गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी हे भोरटेक कजगाव या ठिकाणी शिवारात असल्याचे समजले सदर ठिकाणी शोध घेतला असता दोन संशयित तरुण मिळून आले. त्यांना चौकशी कामी ताब्यात घेतले असता त्यांनी चौकशी दरम्यान शिरसगाव, तळोंदा येथील विहिरीतील इलेक्ट्रिक मोटर आम्हीच चोरून आणल्याचे कबूल केले.
शेतातून चोरी केलेल्या मोटारी त्यांच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. सदर आरोपींचे नाव गणेश उर्फ शुभम राजेंद्र महाजन रा. कजगाव ता.भडगाव जि. जळगाव आणि सोबत एक विधी संघरशीत बालक, तिसरा आरोपी चेतन साहेबराव शितोळे रा.भोरटेक ता.भडगाव जि. जळगाव हा फरार असून त्याचा शोध घेणे चालू आहे. सदर गुन्हाचा पुढील तपास पोलीस हवालदार योगेश मांडोळे हे करीत आहे.