
उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगाव:-तालुक्यातील रहिपुरी ते वडगांव लांबे रस्त्यावर दिनांक १५ सप्टेंबर २०२४ रविवार रोजी सकाळी २:४० वाजेच्या सुमारास अवैधरित्या वाळू (गौणखनिज) वाहतूक करणारे विना क्रमांकाचे एक ट्रॅक्टर-एक ट्रॉली जप्त करण्यात आले. या ट्रॉली मध्ये सुमारे एक ब्रास अवैध वाळू आढळून आली असता सदरील ट्रॅक्टर पोलीस कवायत मैदान चाळीसगाव येथे जमा करुन पंचनामा रिपोर्ट तहसील कार्यालय येथे सादर केलेला आहे.
महसूल पथकातील मंडळ अधिकारी योगेश सोनवणे, तलाठी प्रशांत कनकुरे, तलाठी राकेश राठोड यांच्या पथकाने ही कारवाई करून वाळूसह महिंद्रा कंपनीचे विना क्रमांकाचे एक ट्रॅक्टर-एक ट्रॉली पोलीस कवायत मैदान चाळीसगाव येथे जमा करुन पंचनामा रिपोर्ट तहसील कार्यालय येथे सादर केलेला आहे.
सध्या गिरणा धरण पाण्याने भरलेले असतांना गिरणा धरणातून नदीपात्रात पाण्याचा प्रवाह सुरू असताना देखील मेहुणबारे, जामदा, रहिपुरी, वडगांव लांबे या भागात बैलगाड्या मार्फत गिरणा नदीपात्रातून ही वाळू अवैधपणे बाहेर काढली जाते. ही चोरीची वाळू रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर मध्ये वाहतूक करून चाळीसगाव शहरात आणि ग्रामीण भागात आजूबाजूच्या गावांमध्ये विकली जाते.
चाळीसगावात शहरात आरटीओ कार्यालय असताना देखील आरटीओ अधिकाऱ्यांना हे विना क्रमांकाचे ट्रॅक्टर-ट्रॉली दिसत नसतील का? विना क्रमांकाचे ट्रॅक्टर जर चोरीचा वाळू वाहतुकीसाठी वापरतात तर हे आरटीओ अधिकारी या वाहनांवर कारवाई का करत नाहीत? तालुक्यात शेतीच्या कामासाठी वापरले जाणारे ट्रॅक्टर अवैध गौणखनिज वाहतुकीसाठी सर्रासपणे वापरले जातात. यावर महसूल प्रशासन आणि आरटीओ अधिकारी कडक कारवाई का करत नाहीत? या अवैध गौणखनिज संदर्भात कोणाच्याही दबावाला बळी न पडता, आरटीओ विभाग चाळीसगाव, चाळीसगाव महसूल विभाग, आणि चाळीसगाव शहर, चाळीसगाव ग्रामीण आणि मेहुनबारे पोलीस स्टेशन यांनी जास्तीत जास्त कडक कारवाई करावी. अशी सर्व परिसरातील नागरिकांकडून मागणी होत आहे.