Breaking
जळगाव

चाळीसगांव शहर पो.स्टे.कडुन अवैधरित्या दारु विकणारे तसेच सट्यांचे आकडे घेणारे इसमांवर कारवाई. 

0 7 5 0 2 8

प्रतिनिधी कल्पेश महाले.

चाळीसगांव शहर पो.स्टे.चे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक, संदीप पाटील यांना माहिती मिळाली कि, चाळीसगांव शहरातील बस स्टँण्ड परिसरात काही इसम अवैधरित्या दारु विक्री तसेच मटका नावाचा जुगार खेळवत आहे. मिळालेल्या बातमीची खात्री झाली असता अवैधरित्या दारु विक्री करणारे १) शेख रमजु शेख वजीर वय ५५ वर्षे रा. सुवर्णाताई नगर, चाळीसगांव याच्या ताब्यात ५०००/- रुपये किमतीची देशी व हातभट्टीची दारु मिळाली, २) वाल्मीक छोटु शिंपी रा. शाहुनगर, चाळीसगांव याचे ताब्यातुन ३९००/- रुपये किमतीची देशीदारु व गावठी हातभट्टीची दारु मिळुन आली आहे. नमुद इसमांना ताब्यात घेवुन त्यांचेवर महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत.

तसेच बसस्टँण्ड परिसरातच विना परवाना गैरकायदा लोकांकडुन सट्ट्याचे आकडे व रोख पैसे स्विकारुन कल्याण नावाचा मटका जुगार खेळवणारे १) राहुल वसंत पवार रा. नेताजी चौक, चाळीसगांव, २) निलेश मनोज सुर्यवंशी यांच्यावर कारवाई करुन त्यांच्याकडुन सट्टा जुगाराचे साहीत्य व रोख रक्कम ७३५९/- जप्त करण्यात आली आहे. त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

सन २०२३ वर्षे चाळीसगांव शहर पो.स्टे. तर्फे व्यसनमुक्त चाळीसगांव या शिर्षकाखाली जनजागृती वर्षभर करण्यात आली. सन २०२३ मध्ये दारुबंदी कायद्यान्वये एकुण ११३ केसेस करण्यात आल्या असुन त्यात ११९ इसमांवर कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाई दरम्यान ६,५९,०२८/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच ०५ प्रतिबंधीत गुटख्याच्या केसेस करण्यात आल्या असुन ०७ इसमांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडुन १,१३,०२,५९४/- रुपये किमतीचा मुद्देमाल पान मसाला, सुगंधीत सुपारी, विमल गुटखा जप्त करण्यात आला आहे. वर्षभरात ०७ NDPS काद्यान्वये अंमली पदार्थाबाबत कारवाई करुन ११ आरोपीतांना अटक करुन, त्यांचेकडुन २१,१०,८५०/- रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आलेला आहे.

नविन वर्षात सदर कारवाई झालेल्या इसमांवर पुर्वीचा अभिलेख तपासुन MPDA सारख्या प्रतिबंधात्मक कारवाई करुन सदर आरोपीतांना ०१ वर्षासाठी स्थानबध्द करण्यासाठी प्रस्ताव सादर करणार आहोत.

सन २०२४ हे नविन वर्ष चाळीसगांव शहर पो.स्टे. चाळीसगांव शहर सुरक्षित शहर या शिर्षकाखाली काम करणार असुन, शहर सुरक्षेसाठी सर्व उपाययोजना करुन शहर वासियांचापण सहभाग आवश्यक आहे. वर्षभराची सर्व कामगीरी ही मा. श्री.एम. राजकुमार सो. पोलीस अधिक्षक यांचे तसेच मा. अपर पोलीस अधिक्षक सो. श्री रमेश चोपडे व मा. सहा. पोलीस अधिक्षक सो. श्री अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शन व सुचना प्रमाणे चाळीसगांव शहर पो.स्टे.चे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्याकडुन करण्यात आलेली आहे.

3/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 5 0 2 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे