भवाळी येथील अंगणवाडीतील पोषक आहारात अळ्या व किडे…

भवाळी येथील अंगणवाडीतील पोषक आहारात अळ्या व किडे…
प्रतिनीधी कलीम सैय्यद.
चाळीसगाव तालुक्यातील भवाळी येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प २ चाळीसगाव अंतर्गत येणाऱ्या सरस्वती अंगणवाडी क्र १ येथे लहान मुलांचां पोषक आहार अत्यंत खराब अवस्थेत मिळत असल्याचे दिसून आले.
सविस्तर बातमी अशी की, चाळीसगाव तालुक्यातील भवाळी येथे सरस्वती अंगणवाडी क्र १ मध्ये लहान मुलांचे पूरक पोषक आहार अतिशय दुर्गंधीमय अवस्थेत आढळून आले. हा प्रकार भवाळी येथील ग्रामस्थांच्या नजरेत आल्यानंतर ग्रामस्थांनी अंगणवाडी क्रमांक एक येथे जमाव केले असता, लहान मुलांच्या पोषक आहारात अक्षरशः कुजलेल्या अवस्थेत किडे व आळ्या दिसून आल्या.
अंगणवाडी क्रमांक १ येथे लहान मुलांना पोषक आहार म्हणून आशा पद्धतीचे अन्न देण्यात येत आहे का? मुलांची जीवीत हानी झाली तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण करत पालक वर्गाने मोठा संताप व्यक्त केला.
अंगणवाडी आवारात घाणीचे साम्राज्य…
ज्या ठिकाणी अंगणवाडी इमारत बांधलेली आहे. त्याच्या परिसरात प्रचंड अस्वस्थ अवस्थेत उकिरड्यागत घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. व बालकांना प्रत्येक दिवशी एकच अन्न, ते पण निकृष्ट दर्जाचे अक्षरशः अळ्या व किडे असलेले धान्य शिजवून खायला दिले जात आहे का ? असा प्रश्न निर्माण केल्यामुळे, त्यामुळे काही वेळ अंगणवाडी परिसरात पालक वर्गाने मोठा संताप व्यक्त करत तणावाचे वातावरण निर्माण केले होते.
या बाबत लवकरात लवकर संपूर्ण चौकशी करावी व उत्कृष दर्जाचे पोषक आहार देण्यात यावा व परिसरात साफ सफाई करावी, अन्यथा आंदोलनाचा इशार पालक वर्गाने दिला आहे.