मेहूनबारे पोलिसांची हातभट्टी दारू अड्यावर धाड…

चाळीसगाव प्रतिनिधी.
मेहुंनबारे पोलीस स्टेशन हद्दीत दारू मोठ्या प्रमाणात तयार केली जाते व खुलेआम विकली जाते. अशा वारंवार तक्रारी बघायला मिळत होत्या. त्याच अनुषगाने मेहूनबारे पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षण संदीप परदेशी यांनी आपले तपास चक्रे फिरवलीच होती. त्यातच त्यांना गुप्त सूत्र धारांच्या वतीने सायगाव शिवारात मोठ्या प्रमाणात दारू विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन कारवाई केली त्यामुळे सर्वत्र त्यांची वाहवा केली जात असून महिला वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.
सविस्तर माहिती अशी की, मेहूनबारे पोलीस स्टेशन हद्दीत गिरणा नदीच्या काठी एक व्यक्ती मोठ्या प्रमाणावर गावठी दारूची नेहमी निर्माती करतो अशी एका गुप्त सूत्रधार कडून मिळाली. त्याच माहितीच्या आधारे मेहूनबारे पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांनी माहिती गुप्त ठेवत, कोणालाही कुठ जायचं आहे हे न सांगता आपल्या सहकारी सह.फौ.मिलिंद शिंदे, पो.हे.काँ.योगेश मांडोळे, पो.हे.काँ. देविदास पाटील, पो.काँ. गोरख चकोर, पो.काँ जितू परदेशी, पो.काँ मिलिंद घुळे, पो.काँ निलेश लोहार, पो.काँ भूषण बाविस्कर, होमगार्ड रामदास चव्हाण यांना सोबत घेऊन, सायगाव शिवाराच्या गिराना नदीच्या काठावर असलेल्या दारू भट्टीवर धाड टाकली.
त्यावेळी त्या ठिकाणी किरण भास्कर दळवी हा गावठी हात भट्टी दारू निर्मती करत असल्याचे आढळून आले त्यावेळी, मेहूनबारे पोलिसांना २१५०० रू किंमतीचे २०० लिटर चे दोन ड्रम नवसागर, गूळ मिश्रित फसफसाते कच्चे रसायन व १५००० रू किंमतीचे पक्के रसायन व २० लिटरच्या दोन क्यान गावठी हातभट्टी दारू मिळून आली. एकूण ४०५०० रू किमतीचे कच्चे व पक्के रसायन मिळून आले.
सदर पो.काँ सुदर्शन घूळे यांच्या फिर्यादीवरून किरण भास्कर दळवी यांच्या विरुद्ध मेहूनबारे पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.