अखिल भारतीय मराठा महासंघ तर्फे कल्पेश महाले यांना आदर्श पत्रकार पुरस्कार.

अखिल भारतीय मराठा महासंघ तर्फे कल्पेश महाले यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
जळगाव – नुकताच १५ जून २०२४ रोजी श्रीक्षेत्र पद्मालय ता. एरंडोल येथे अखिल भारतीय मराठा महासंघ जळगाव जिल्हा तर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांना भव्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
चाळीसगाव येथील सत्यकाम न्युज महाराष्ट्र चे उपसंपादक कल्पेश महाले यांना “आदर्श पत्रकार पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले.
यावेळी श्रीमती.स्मिताताई वाघ खासदार जळगाव लोकसभा, श्री.संभाजी राजे दहातोंडे राष्ट्रीय सरचिटणीस अखिल भारतीय मराठा महासंघ, डॉ.गजेंद्र भोसले,राष्ट्रीय संघटक अखिल भारतीय मराठा महासंघ, श्री.दिलीप बापू पाटील जिल्हाध्यक्ष जळगाव, श्री.पी.एम.पाटील जिल्हा उपाध्यक्ष, श्री.खुशाल बिडे जिल्हा संपर्क प्रमुख, श्री.सुरेश पाटील जिल्हा कार्याध्यक्ष, श्री.अशोक भोसले जिल्हा कोषाध्यक्ष, जिल्हा संघटक बी.बी.भोसले, श्री.संभाजी इंगळे जिल्हा सल्लागार, श्री.मच्छिंद्र पाटील जिल्हा सल्लागार, साहेबराव पाटील जिल्हा सचिव, सौ.महानंदा पाटील महिला जिल्हाध्यक्ष उ.बा.ठाकरे गट, श्री.आनंदराव पाटील मा.पंचायत समिती सभापती तथा पद्मालय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.