कुमावत बेलदार समाज सेवा संघाच्या पाचोरा तालूका अध्यक्षपदी शांताराम (अण्णा) दगडु बेलदार यांची नियुक्ती..

कुमावत बेलदार समाज सेवा संघाच्या पाचोरा तालूका अध्यक्षपदी शांताराम (अण्णा) दगडु बेलदार यांची नियुक्ती..
प्रतिनिधी इम्रान शेख. (कासोदा)
पाचोरा – कुमावत बेलदार समाज सेवा संघाची वार्षिक सभा दिनांक २५/०२/२०२४ रोजी उत्साहात संपन्न झाली. कुमावत बेलदार समाज सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री श्रीकांत भाऊ परदेशी, प्रदेश अध्यक्ष आदरणीय श्री प्रदीपजी कामे, प्रदेश सचिव आदरणीय श्री भगवान दादा कुमावत, विभागीय अध्यक्ष श्री.शंकर विठ्ठल कुमावत, जिल्हाध्यक्ष श्री.विनोद (बापू) मोतीलाल कुमावत, युवा जिल्हाध्यक्ष श्री.आकाश कडूबा कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली व भाऊसाहेब श्री रविंद्र नामदेव कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली कुमावत बेलदार समाज सेवा संघाची सभा घेण्यात आली.
या वेळी पाचोरा तालूका नुतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. पाचोरा तालूका अध्यक्ष श्री शांताराम (अण्णा) दगडू कुमावत, महीला आघाडी पाचोरा तालूका अध्यक्षा सौ.संगीता गजानन कुमावत, यूवा अध्यक्ष श्री विलास रतिलाल कुमावत तर महीला यूवा अध्यक्षा सौ.माधुरी नितीन कुमावत यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली. पुरुष कार्यकारिणी कार्याध्यक्ष श्री संजय नामदेव कुमावत, सचिव श्री अनिल रामसिंग कुमावत, सहसचिव श्री योगेश रामभाऊ कुमावत, कोषाध्यक्ष श्री दिलीप ओंकार कुमावत, सह कोषाध्यक्ष श्री नारायण निवॄत्ती कुमावत, विभागीय उपाध्यक्ष श्री सतीष किसन कुमावत,
श्री नाना चिंधा कुमावत, श्री शरद बाळू कुमावत, श्री पांडुरंग गोविंदा कुमावत, श्री ज्ञानेश्वर दिनकर कुमावत, श्री किशोर नारायन कुमावत, श्री बाळू शंकर कुमावत, श्री दिपक केशरलाल कुमावत व सदस्य श्री भगवान अमृत कुमावत, श्री शालीक दगडू कुमावत, श्री प्रकाश नारायण कुमावत, श्री शरद किसन कुमावत, श्री ज्ञानेश्वर बळवंत कुमावत, श्री कैलास विश्वनाथ कुमावत, श्री मुकेश शामराव कुमावत सह यावेळी सर्व उपस्थित समाज बंधू भगिनींनी नुतन कार्यकारिणीचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री निलेश लक्ष्मणराव कुमावत सर व आभार प्रदर्शन श्री नारायण निवृत्ती कुमावत सर यांनी मानले. यावेळी कुमावत बेलदार समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.