राष्ट्रीय ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थिनींना मोफत एस.टी.पासचे वितरण.

(उपसंपादक – कल्पेश महाले)
चाळीसगांव:- शहरातील राष्ट्रीय ज्युनियर काँलेज मधे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मोफत पास योजने अंतर्गत अकरावी व बारावी च्या तब्बल ६०० विद्यार्थिनींना चाळीसगाव बस आगार चे वाहतुक निरीक्षक शुभम झगडे व वाहतुक नियंत्रक विनोद देशमुख यांच्या हस्ते एस.टी.पासचे नुकतेच वितरीत करण्यात आले.
यावेळी अहिल्यादेवी होळकर यांचे प्रतिमा पुजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.तुषार चव्हाण यांनी केले तर सुत्रसंचालन प्रा.समाधान निकम यांनी केले तर प्राचार्य वाय.आर.सोनवणे, उपप्राचार्य डॉ.मनोज शितोळे यांनी आपल्या मनोगतातून उपस्थित विद्यार्थ्यांनींना पास हा जीवन एक शिकण्यासाठी साधन आहेत. दगड-माती चे गोटे खाऊन शिक्षिका झाल्या त्याचा आदर्श घेऊन आपण आई-वडील चे नाव मोठे करा. असे मौलीक मार्गदर्शन केले. उपस्थीत पाहुण्यांचा सत्कार प्राचार्य वाय.आर.सोनवणे व डॉ.मनोज शितोळे यांच्या हस्ते करण्यात आले. एस. टी. पास. विभागाचे काँलेजचे समन्वयक व क्रिडा विभागाचे प्रा.निलेश गाढवे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील विद्यार्थींनी व प्राध्यापक बंधु-भगिनी हजर होते. यावेळी प्रा.एस.एन.सांगळे, प्रा.विद्या देशमुख, प्रा.संगीता सोनवणे, प्रा.शरदराव शेळके, प्रा.शुभम देशमुख, प्रा.भुषण चव्हाण, प्रा.राहुल केदार, प्रा.संदिप चौधरी उपस्थित होते. आभार प्रदर्शन प्रा.किरण पाटील यांनी केले.