सत्यकाम न्युज च्या वतीने विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान.

मुख्यसंपादक – राजेंद्र न्हावी
चाळीसगांव – सत्यकाम न्युज महाराष्ट्र तर्फे विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान व पुरस्कार वितरण सोहळा २०२४ नुकताच अंधशाळा मैदान भडगाव रोड चाळीसगांव येथे संपन्न झाला.
यावेळी राजकीय क्षेत्रातील आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्कार २०२४ मा.श्री. खासदार उन्मेष दादा पाटील यांना देण्यात आला. त्यांच्या वतीने त्यांचे वडील भैय्यासाहेब पाटील यांनी तो पुरस्कार स्वीकारला. तसेच सामाजिक क्षेत्रातील आदर्श समाजसेवक पुरस्कार २०२४ श्री भिमराव हरी खलाणे, श्री बापूराव निंबा पवार गुरुजी, श्री तुषार निकम, शांताराम (अण्णा) बेलदार यांना देण्यात आला.
पोलीस विभागातील आदर्श पोलीस कर्मचारी पुरस्कार २०२४ श्री प्रशांत पाटील यांना देण्यात आला.
देशसेवेतील आदर्श सैनिक अधिकारी पुरस्कार २०२४ सुभेदार श्री धोंडू प्रताप काकडे (भारतीय सेना) यांना देण्यात आला. उद्योजक क्षेत्रातील आदर्श उद्योजक पुरस्कार २०२४ श्री राजशेठ पुंशी यांना देण्यात आला.
पत्रकारिता क्षेत्रातील आदर्श पत्रकार पुरस्कार २०२४ श्री किसनरावजी जोर्वेकर, श्री भुरण अण्णा घुले, श्री नारायण जेठवाणी, श्री आर डी चौधरी (छोटा), श्री राकेश निकम, श्री योगेश मोरे, श्री महेंद्र सूर्यवंशी, श्री विजय गवळी, श्री रवींद्र कोष्टी, श्री आनंद गांगुर्डे, श्री रणधीर जाधव, श्री शुभम पाटील, श्री दीपक जाम, श्री सुनील पाटील, श्री खुशाल भिडे, अशपाक पिंजारी, गफ्फार शेख, श्री सोजीलाल हडपे, श्री संतोष भोई, श्री दीपक परदेशी, इम्रान शेख, कलिम सैयद, श्री विलास पाटील, श्री लखण गरुड, श्री जितेंद्र चौधरी, श्री संजय पाटील, श्री पवन पाटील यांना देण्यात आला.
साहित्य क्षेत्रातील आदर्श कवी पुरस्कार २०२४ श्री दिनेश चव्हाण, यांना देण्यात आला. त्यावेळी उमंगच्या संस्थापिका सौ संपदाताई उन्मेष पाटील यांनी या कार्यक्रमाला भेट दिली त्यावेळी त्यांचा सत्कार सत्यकाम न्युज च्या वतीने ऐश्वर्या सोनार यांनी केला. त्यावेळी उपसंपादक व कार्यक्रमाचे आयोजक कल्पेश महाले यांचे आभार मानत सौ संपदाताई उन्मेष पाटील यांनी जाहीर सत्कार केला.
या भव्य कार्यक्रमाचे आयोजन सत्यकाम न्युज चे उपसंपादक, राष्ट्रीय मॅरेथॉन खेळाडू चाळीसगाव आणि सत्यकाम न्युज च्या वतीने करण्यात आले होते. यावेळी सुत्रसंचालन एश्वर्या सोनार यांनी केले.
यावेळी सत्यकाम न्युज चे संपादक, उपसंपादक, कार्यकारी संपादक सह तालुका प्रतिनिधि ग्रामीण भागातील प्रतिनिधि सह चाळीसगाव तालुक्यातील पत्रकार मोठ्या संखेने उपस्थित होते.
बदलती राजकीय परिस्थिती आणि सरकारची अरेरावी लोकशाहीच्या दृष्टी ने धोकादायक ठरत आहे – जेष्ठ पत्रकार किसनरावजी जोर्वेकर
बदलती राजकीय परिस्थिति आणि सत्ताधाऱ्यांची अरेरावी ही लोकशाहीच्या दृष्टीने धोकादायक ठरू पाहत आहे. या दोन्ही गोष्टी च्या पार्श्वभूमीवर पत्रकारानी संघटीत होण्याची व आपली संघटनात्मक ताकत वाढवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार किसनरावजी जोर्वेकर यांनी केले. अलीकडच्या सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्ष व विरोधक जसे नकोसे झालेले आहेत. तसे त्यांना सत्य सांगणारे आणि बोलणारे पत्रकार ही आपले शत्रू वाटायला लागले आहेत म्हणून सध्या स्थितीत वृत्तपत्राचे व पत्रकाराचे स्वतंत्र देखील धोक्यात आलेले आहेत. अशा परिस्थीतीत प्रसिध्दी माध्यमांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी व समाजाचे हक्क आणि अधिकारासाठी पत्रकारांना परिणामाची पर्वा न करता लढावे लागणार आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीशांच्या विरूध्द पत्रकारीता करताना पत्रकारांनी समाजप्रबोधनाचे आणि जागृतीचे काम केले. पत्रकारांच्या या कामाला समाजाचे बळ मिळाले. मात्र सद्यस्थितीत अन्यायाविरूध्द लिहीणाऱ्या आणि निर्भीड पत्रकारीता करणा-या पत्रकारांना शासन, प्रशासन सुड भावनेने वागवत आहे आणि समाज देखील अशा पत्रकारांना पाठबळ देत नसल्याने पत्रकारीता खुप जोखमीची झालेली आहे. या जोखमीच्या पार्श्वभूमीवर समाजाचा मित्र, हितचिंतक, लोकशाहीचा रक्षक म्हणून पत्रकाराने काम करतांना आपल्या कुटुंबाकडे लक्ष देण्याची आणि राजकर्त्यांची गुलामगिरी झिडकारून देण्याची देखील गरज असल्याचे किसनरावजी जोर्वेकर यांनी सांगितले.
बेलगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक व खासदार उन्मेश पाटील यांचे पिताश्री भैय्यासाहेब पाटील, चाळीसगांव वकील संघाचे अध्यक्ष कैलास आगोणे, ऍड योगेश निकम, युवा उद्योजक राज पुन्शी, भुषण बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भिमराव खलाणे, तेली समाज पंच मंडळाचे महासचिव (सेक्रेटरी) बापुराव पवार गुरूजी, प्रा. तुषार निकम, चाळीसगांव एज्युकेशन सोसायटीचे सचिव व आई हॉस्पिटल चे संचालक डॉ. विनोद कोतकर, ज्येष्ठ पत्रकार भुरन घुले, जेष्ठ शिक्षक विजय महाले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
आरोग्य आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी सदृढ समाजाचे लक्षण – डॉ. विनोद कोतकर
आरोग्य आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी सदृढ समाजाचे लक्षण असल्याचे डॉ. विनोद कोतकर यांनी यावेळी बोलतांना सांगितले आणि त्यांनी येत्या निवडणूकांमध्ये प्रसार माध्यमांना मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार असल्याचे देखील ते म्हणाले.
अशा सन्मान कार्यक्रमातून काम करण्याची प्रेरणा मिळते – ऍड कैलास आगोणे
आजच्या कार्यक्रमात विधी क्षेत्रात काम करणाऱ्यांचा जो सन्मान करण्यात आला त्याबद्दल ऍड. कैलास आगोणे यांनी संयोजकांचे आभार मानले व अशा सन्मान कार्यक्रमातून काम करण्याची प्रेरणा मिळते असेही ते म्हणाले. राज्यघटना जिवंत ठेवण्याची आणि समाजाला न्याय देण्याचे काम वकील करतात. मात्र त्यांच्यावरच आता हल्ले होवू लागले आहेत. त्यांचे दिवसाढवळ्या खून होतात. अशावेळी वकील संरक्षण कायदा तातडीने अंमलात आणण्यात यावा अशी मागणी देखील आगोणे यांनी केली.
वस्तुस्थिती समाजापुढे मांडणे हे अत्यंत धाडसाचे काम – मा.श्री भैय्यासाहेब पाटील
वस्तुस्थिती समाजापुढे मांडणे हे अत्यंत धाडसाचे काम आहे व हे काम पत्रकार बांधव करतात. त्यामुळेच समाजातील घटकांना न्याय मिळतो, त्यांच्या समस्या सुटण्यास मदत होते असे भैय्यासाहेब पाटील यांनी यावेळी बोलतांना सांगितले आणि त्यांनी सत्यकाम न्युज व सत्यकाम न्युज चे उपसंपादक कल्पेश महाले यांनी आयोजित केलेला कार्यक्रम पत्रकारांच्या एकतेचे दर्शन देणारा असल्याचे ही सांगितले.
समाजातील वैचारीक प्रदुषण दुर करणारा घटक म्हणजे पत्रकार – युवाउद्योजक राज पुन्शी
पत्रकारांविषयी आपल्याला खुप आदर आहे. समाजातील वैचारीक प्रदुषण दुर करण्याचे आणि समाजाला न्याय देण्याची भुमिका पत्रकार घेत असल्याने आपण पत्रकार बांधवांच्या संदर्भात नेहमीच सहकार्याची आणि आपुलकीची भावना ठेवत असल्याचे युवा उद्योजक राज पुन्शी यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजन करून एक वेगळा पायंडा सत्यकाम न्युज व सत्यकाम न्युज चे उपसंपादक कल्पेश महाले यांनी पाडला – मा.श्री बापुराव पवार गुरुजी
आजचा कार्यक्रम समाजाच्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांच्या कामाचे कौतुक करणारा व त्यांना सन्मान देणारा आहे. या कार्यक्रमाचे आयोजन करून एक वेगळा पायंडा सत्यकाम न्युज व सत्यकाम न्युज चे उपसंपादक कल्पेश महाले यांनी पाडल्याचे तेली समाज पंच मंडळाचे सेक्रेटरी बापुराव पवार गुरूजी यांनी सांगितले आणि त्यांनी कल्पेश महाले यांचे वडील विजय आण्णा यांच्या योगदानाचाही आपल्या भाषणात उल्लेख केला.
अडचणींना सामोरे जाऊन पत्रकारिता करीत असतो तोच खरा पत्रकार – मा. श्री राकेश निकम
पत्रकार श्री राकेश निकम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी सामाजिक क्षेत्रात काम करतांना पत्रकारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, असे असले तरी ध्येयप्रेरीत पत्रकार समस्यांवर मात करून पुढे जात असतो. पत्रकारीता हे एक दिव्य असल्याचेही ते म्हणाले. कल्पेश हा नवतरुण उंदा धडाडीचा पत्रकार असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी भाषणात केला.
पत्रकारांनीच पत्रकारांची दखल घेणारा हा कार्यक्रम – ज्येष्ठ पत्रकार भुरण अण्णा घुले
पत्रकारांनीच पत्रकारांची दखल घेणारा हा कार्यक्रम आहे आणि असा कार्यक्रम पहिल्यांदा आयोजित करण्यात आला आहे असे ज्येष्ठ पत्रकार भुरण अण्णा घुले यांनी सांगितले.
सामाजिक क्षेत्रात काम करणा-यांचा उत्साह वाढविणारा कार्यक्रम – प्रा. तुषार निकम
प्रा. तुषार निकम यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, सामाजिक क्षेत्रात काम करणा-यांचा उत्साह वाढविणारा, त्यांना प्रेरणा व शाब्बासकी देणारा हा कार्यक्रम असल्याचेही त्यांनी सांगितले.