
(उपसंपादक – कल्पेश महाले)
दिनांक १२ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री पेट्रोलिंग करत असताना, पोलीसांनी हनुमान वाडी परिसरात एक संशयास्पद गाडी एम.एच.०२ बी.टी. ६६१२ या क्रमांकाची मारुती स्विफ्ट थांबवून तपासणी केली असता, त्या गाडीत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखू आढळून आले. सदर मुद्देमालाची किंमत सुमारे ३ लाख १९ हजार ५७४ रुपये आणि गाडीची किंमत ५ लाख रुपये असा एकूण ८ लाख १९ हजार ५७४ रुपये किमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला.
सदर प्रकरणाती आरोपी सउद अहमद गुलाब दस्तगीर अंसारी रा. नागर दरवाजा रोड येवला जिल्हा नाशिक आणि सईद ताहीर अन्सारी रा. मोमीनपुरा, येवला यांच्यावर गुन्हा नोंद क्रमांक ४४१/२४ कलम १२३, २२३, २७४, २७५ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २३ – सह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम, २००६ – कलम २६(२)(iv), ५९अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले करीत आहेत.
सदर कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव श्रीमती कविता नेरकर आणि डीवायएसपी धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी व त्यांच्यासोबतचे गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक कैलास पाटील, पोलीस हवा.योगेश बेलदार, पोलीस हवा. नितीन वाल्हे, पोलीस हवा.रमेश पाटील, पो.कॉ. दिपक चौधरी, पो.कॉ. निलेश पाटील, पो.कॉ.शरद पाटील यांनी केली आहे.