खडकीसिम फाट्यावर रस्त्यावर स्थानिक परिसरातील गोरक्षकांनी वाचविले एक गायीसह चार वासरूंचे प्राण

खडकीसिम फाट्यावर रस्त्यावर स्थानिक परिसरातील गोरक्षकांनी वाचविले एक गायीसह चार वासरूंचे प्राण
उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगांव – तरवाडे जि.धुळे येथील समाधान पाटील यांना तरवाडे गावाच्या बस स्टँड वरून मेहूनबारे च्या दिशेने भरधाव वेगाने गाय व काही वासरू घेऊन जाताना छोटा हत्ती गाडी दिसली असता, त्यांना संशय आल्याने त्यांनी लगेच मित्र विरेंद्र राजपुत रा. खडकीसिम यांना कॉल करून माहिती सांगितली व खडकीसिम फाट्यावर गाडी थांबविण्यास सांगितले आणि मित्र भरत वाघ, उल्हास शितोळे, सोमनाथ बोरसे रा. मेहूनबारे यांना कॉल करून खडकीसिम फाट्यावर येण्यास सांगितले. त्यांनी सदरील गाडी थांबविली असता गाडीत १ गाय व ४ वासरू आढळले असता चालक यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अन्सार सांडू शेख, वय ३०, रा. मेहूनबारे ता.चाळीसगाव असे सांगितले आणि सदरचे गुरे गाई व शेतकऱ्यांचे असून ते बाजारात विक्री साठी घेऊन जात आहे असे सांगितले.
सदरील शेतकऱ्यांचे नाव, गाव विचारले असता चालकाने काहीही एक सांगीतले नाही, गुरे खरेदी विक्री चा परवाना व पावत्या विचारले असता काहीही आढळले नाही, सदरील वाहन निर्दयीपणे समाजापेक्षा जास्त प्रमाणात वरील जनावरे भरून वाहतूक करताना मिळून आला म्हणुन आम्हाला संशय आल्याने समाधान पाटील तरवाडे ता.जि.धुळे यांच्या फिर्याद वरुन सदर टाटा छोटा हत्ती मालवाहू गाडी क्रमांक ०९ एच.९६४१ ही गाडीसह १ गाय व ४ वासरू एकूण १,७८,०००/- रुपयांचा ऐवज पोलीसांनी जप्त करून १९६० कलम ११ (१) (ड), ११(१) ई, मो.वा.नि.१९८९, ६६, १९२ प्रमाणे पो.कॉ. सचिन निकम यांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सहा.पोलीस निरीक्षक संदिप परदेशी यांच्या आदेशान्वये पो.कॉ.मोहन सोनवणे करीत आहेत.