लाचखोर कामगार निरीक्षकाला ३६ हजारांची लाच घेतांना जळगांव एसीबीने रंगेहात पकडले

लाचखोर कामगार निरीक्षकाला ३६ हजारांची लाच घेतांना जळगांव एसीबीने रंगेहात पकडले
उपसंपादक – कल्पेश महाले
जळगांव – तक्रारदार यांना मुकादम पदावरून स्थगिती दिल्यानंतर त्याबाबत सहाय्यक कामगार आयुक्त येथे सुनावणी सुरू असतांना निकाल लावण्यासाठी लावून देतो असे सांगून ५० हजारांची मागणी करत तडजोडीअंत ३६ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाच्या कामगार निरीक्षकाला जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकांत पाटील वय-५७, रा. जळगाव असे अटक केलेल्या कामगार निरीक्षकाचे नाव आहे.
यावेळी सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार हे जळगाव शहरातील रहिवाशी आहेत. ते माथाडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष तथा मुकादम म्हणून करत होते. तक्रारदार यांना मुकादम पदावरून स्थगिती देण्यात आली होती. याबाबत सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे सुनावणी सुरू आहे. दरम्यान या सुनावीचा निकाल लावण्यासाठी कामगार निरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी या सुनावणीचा निकाल सहाय्यक कामगार आयुक्त यांना सांगून लावून देतो असे सांगत तक्रारदार यांना ५० हजारांची लाचेची मागणी केली.
त्यानंतर तक्रारदार यांनी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे ५ ऑगस्ट रोजी तक्रार दिली होती. या तक्रारीची पडताळणीसाठी गुरुवार ८ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता जळगांव एसीबीने सापळा रचला. त्यावेळी कामगार निरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी तडजोडीअंती ३६ हजारांची लाच घेतांना जळगांव एसीबी पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी त्यांच्यावर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस जळगांव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुहास देशमुख, पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलीस निरीक्षक एन. एन.जाधव, पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, पो.हे.कॉ.सुरेश पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर पो.ना. बाळू मराठे, किशोर महाजन, सुनील वानखेडे, पो.कॉ.राकेश दुसाने, प्रणेश ठाकूर, प्रदिप पोळ, अमोल सूर्यवंशी, सचिन चाटे यांनी कारवाई केली.
या कारवाईमुळे नोकरी व्यतिरिक्त हरामाचा पैसा कमावणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचारींमध्ये जळगांव जिल्हयात चांगलीच खळबळ उडाली आहे.