चाळीसगाव पोलीस प्रशासन व रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमाने मॅरेथॉन स्पर्धा संपन्न!

चाळीसगाव पोलीस प्रशासन व रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमाने मॅरेथॉन स्पर्धा संपन्न!
कल्पेश महाले चाळीसगांव ता.प्रतिनिधी
आज चाळीसगाव शहरात पोलीस प्रशासनाच्या वतीने ‘एक धाव व्यसनमुक्तीसाठी म्हणून मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये सुमारे ५०७० स्पर्धक सहभागी झाले होते.
चाळीसगाव पोलीस विभागाने सुदृढ आरोग्यासाठी व्यसनाधीनता या गोष्टींवर आळा घालण्यासाठी निरोगी आरोग्य, सदृढ शरीर व चांगले विचार समाजामध्ये तेवत ठेवायचे असतील तर निर्व्यसनी जीवन अतिशय महत्त्वाचे आहे. आणि म्हणूनच व्यसनमुक्तीच्या प्रबोधनासाठी एक धाव व्यसनमुक्तीसाठी हा मॅरेथॉनचा कार्यक्रम संपन्न झाला.
या मॅरेथॉनमध्ये सुमारे ५०७० स्पर्धक सहभागी झाले होते. अतिशय सुनियोजित असे नियोजन करून स्पर्धकांना वारमाप साठी सकाळी पाच वाजता झुम्बा डान्स घेण्यात आला. तदनंतर मालेगाव रोड वर १० कि.मी व ५ किलोमीटरच्या स्पर्धकांची स्पर्धा उपस्थित मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखऊन सुरू केली. तसेच ३ कि.मी प्रेरणादायी फॅमिली रन म्हणून धुळे रोडवर मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. स्पर्धकांसाठी प्रत्येक दीड किलोमीटरवर वॉटर पॉईंट व चेअरअप पॉईंट आयोजित करण्यात आला होता. तसेच रिटर्न पॉईंट वर देखील पाणी, संगीत व प्रेरणादायी नृत्याची व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक सहभागी स्पर्धकाला टी-शर्ट व मेडल देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, नाशिक पोलीस अधीक्षक सचिन गोरे, मालेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुंजाळ, चाळीसगावचे आमदार मंगेशदादा चव्हाण, जे,डी,सी,सी बँक चे संचालक प्रदीपदादा देशमुख, कन्नड विभागीय पोलिस अधिकारी ठाकूरवाड, उमंग च्या संस्थापिका सौ. संपदाताई उन्मेष पाटील, शिवनेरी फौंडेशनच्या संस्थापिका सौ. प्रतिभा ताई मंगेश चौव्हान, चाळीसगाव प्रांाधिकारी प्रमोद हिले, धुळे पोलीस निरीक्षक के के पाटील, चाळीसगाव पोलीस निरीक्षक संदीप पाटील, चाळीसगाव तहसीलदार प्रशांत पाटील, श्री प्रशांत ठोंबरे मुख्याधिकारी चाळीसगाव, चाळीसगांव गटविकास अधिकारी न.पा.श्री नंदकुमार वाळेकर, नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे, डॉ. जयवंत देवरे, चाळीसगाव वाहतूक निरीक्षक तुषार देवरे, वनाधिकारी श्रीमती शितल नगराळे, आर,फ,ओ विवेक देसाई, चेअरमन भारत वायररोप मुरारीलाल मित्तल, मनन मित्तल, वैभव पाटील गुजरात अंबुजा, भोजराज पूंशी, माजी नगराध्यक्ष. श्री ब्रिजेश(भैय्या) पाटील अध्यक्ष, चंद्रेश लोढाया सचिव रोटरी क्लब चाळीसगाव, रोटे प्रितेश कटारिया प्रकल्प प्रमुख, यासह क्रीडा शिक्षक प्रमुख एम.वाय.चव्हाण सर प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ही स्पर्धा ज्यांच्या संकल्पनेतून घेण्यात आली असे श्री.अभयसिंह देशमुख साहेब (DySp) यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात स्पर्धेचे आयोजन व्यसनमुक्तीच्या लढ्यासाठी प्रेरणा देण्याची संकल्पना मॅरेथॉन मधून जनजागृती करून घेण्याचे उद्दिष्ट आहे. असे सांगून तरुणाईला निरोगी आरोग्यासाची उपयुक्तता आनंदी व समाधानी जीवनासाठी गरजेची आहे व त्यासाठी पोलीस विभाग कटिबद्ध आहे व त्याचाच एक भाग म्हणून ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
माननीय आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या मनोगतातून स्पर्धेच्या आयोजनाचे कौतुक करून एक अल्हाददायी, आनंदही वातावरण निर्माण करून निरोगी आरोग्याचे मनोबल वाढविण्यासाठी घेण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. व निरोगी आरोग्याचा संदेश स्पर्धकांना दिला. आदरणीय श्री सचिन गोरे साहेब (S.P) यांनी तंदुरुस्त शरीरासाठीचा आरोग्य मंत्र देऊन मार्गदर्शन केले.
श्रीअशोक नकाते(S.P) साहेब यांनी आपल्या विद्यार्थी जीवनातील आठवणी ताज्या करून मी देखील मॅरेथॉन स्पर्धेचा स्पर्धक होतो हे सांगून स्पर्धकांची मन जिंकली व स्पर्धेच्या नियोजनाचे कौतुक करून व्यसनमुक्ती जीवनासाठी मार्गदर्शन केले.
यानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते १० कि.मी प्रथम रामेश्वर गुंजाळ, द्वितीय विशाल चव्हाण, तृतीय जयेश पाटील १० कि.मी महिला प्रथम शेवंता पावरा, द्वितीय वैभवी खेडकर ,तृतीय विशाखा कास्कर. ५ कि.मी प्रथम रोहित बिन्नर, द्वितीय सुनील बारेला, तृतीय दिनेश वसावे ५ कि.मी महिला प्रथम रिक्की पावरा, द्वितीय सुनीता पावरा तृतीय वैष्णवी खेडकर ३ की.मी प्रथम गणेश रोकडे, द्वितीय आकाश जाधव, तृतीय निलेश मोरे तसेच पोलीस प्रोत्सहानपर १० कि.मी पूर्ण करणारे व प्रथम क्रमांक मिळवणारे
१) पोलीस शिपाई संदीप बाळासाहेब पाटील नेम . चाळीसगाव शहर पो स्टे २) सौ मालती बच्छाव नेम. चाळीसगाव ग्रामीण पो स्टे यांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन गौरवण्यात आले.
श्री ब्रिजेश (भैय्या) पाटील अध्यक्ष व चंद्रेश लोडाया सचिव रोटरी क्लब चाळीसगाव प्रकल्प प्रमुख प्रितेश कटारिया व सर्व सन्माननीय रोटरी सदस्य व पोलीस कर्मचारी चाळीसगाव यांनी अतिशय मेहनत घेऊन उत्कृष्ट नियोजन केल्याचे सर्वच मान्यवरांनी आपल्या मनोगतातून कौतुक केले.
या स्पर्धेसाठी ज्यांनी प्रायोजकत्त्व स्वीकारले होते असे अंबुजा ग्रुप, भारत वायर रोप, जे बी एम ग्रुप, एस .एस .आय. पी .एल ग्रुप. दुबई ड्रायफ्रूट्स, महावीर हॉस्पिटल, देवरे हॉस्पिटल, आशीर्वाद हॉस्पिटल, समर्थ हॉस्पिटल, हॉटेल कमल शांती पॅलेस, सोमनाथ सराफ, बी.पी.टी.एल ग्रुप. झांबुई गिफ्ट गॅलरी, डीपीएस फायनान्शिअल सर्विस, कल्याण ग्रुप, वरही फॉर्म, न्यू साई मोबाईल यांचे प्रोप्रायटर यांना सन्मान चिन्ह देऊन दातृत्व बद्दल आभार मानण्यात आले.
पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य व शिक्षकांनी उपस्थिती देऊन विद्यार्थ्यांकडून झुंबा व गणेश वंदना करून स्पर्धकांना आकर्षित केले.
सदर स्पर्धेच्या आभार प्रदर्शन श्री संदीप पाटील साहेब पोलीस निरीक्षक चाळीसगाव यांनी करताना चाळीसगाववाशी यांचे तसेच व्यासपीठावरील मान्यवरांचे ,क्रीडा शिक्षक , प्रायोजक व भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल स्पर्धकांचे मनःपूर्वक आभार मानून सहभागी सर्व स्पर्धकांना उत्तेजनार्थ मेडल देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.