चाळीसगाव शहर पोलीसांची कामगिरी मोटारसायकल चोराला अटक .

ता.प्रतिनिधी कल्पेश महाले.
चाळीसगाव तहसील कार्यालयासमोरून दि २० रोजी चोरीस गेलेली मोटारसायकल २२ रोजी गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी तपासचक्रे फिरवून मोटारसायकल सह चोरट्यास खडकी बायपास येथून ताब्यात घेतले आहे.
सागर अजितराव देशमुख ३५ इंजिनियर रा. लक्ष्मीनगर, परदेशी बोर्डिंग समोर, चाळीसगाव यांची ४० हजार रुपये किमतीची होंडा शाईन कंपनीची काळ्या रंगाची मोटार सायकल क्रमाक MH १९ BA ००६४ ही दि २०/१२/२०२२ रोजी तहसील कार्यालय समोरून दुपारी १२:३० ते १:३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती त्यांनी 2 दिवस तपास केल्यावर दि २२/१२/२०२३ रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल केल्यावर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता एक संशयित इसम हिरापूर कडून चाळीसगाव कडे विना नंबरच्या मोटारसायकल वर येत असल्याची गोपनीय माहिती पोलीस नाईक महेंद्र पाटील व कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर गिते यांना मिळाल्यावर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राहुल सोनवणे, पोलीस नाईक महेंद्र पाटील, भूषण पाटील, कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर गिते, विजय पाटील, पवन पाटील, समाधान पाटील, आशुतोष सोनवणे, रविंद्र बच्छे, ज्ञानेश्वर पाटोळे, राकेश महाजन यांनी दि २२ रोजी सायंकाळी ७:३० ते ८:३० वाजेच्या सुमारास चेतन संतोष पाटील २८ रा शिवशक्ती नगर भडगाव रोड चाळीसगाव यास थांबवून मोटारसायकलचे कागदपत्रे विचारपूस केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्यावर त्यास चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन ला आणून पोलिसी खाक्या दाखवताच तहसील कार्यालयासमोरून वरील मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक भूषण पाटील करीत आहेत.