जळगाव
चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन कडून २४ तासात ट्रॅक्टर चोरास अटक…

0
7
5
4
2
4
चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन कडून २४ तासात ट्रॅक्टर चोरास अटक…
प्रतिनिधी कल्पेश महाले (चाळीसगांव)
चाळीसगाव – दिनांक २३/०२/२०२४ रोजी फिर्यादी ट्रॅक्टर मालक गणेश गोविंदराव झेंडे वय-३५ यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे भाग-५ गुरनं ८३/२०२४ भादवि कलम ३७९ गुन्हा दाखल होता.
चाळीसगाव शहर पोलीस यांना मिळालेल्या गोपनिय माहिती व तांत्रिक विश्लेषण द्वारे २४ तासात आरोपी नामे प्रेमसिंग देवराम पावरा राहणार मध्य प्रदेश याला मुद्देमाल सह अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक जळगाव डॉ.महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव भाग श्रीमती कविता नेरकर-पवार, सहाय्यक पोलीस अधीक्षक चाळीसगाव भाग श्री.अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील पथक यांनी पोहेकॉ प्रशांत पाटील, पोकॉ आशुतोष सोनवणे, पोकॉ रविंद्र बच्छे यांच्या पथकाने केली.
0
7
5
4
2
4