Breaking
जळगाव

जळगाव येथे नुकताच जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा.

0 7 5 1 4 4

(कार्यकारी संपादक – संजय महाजन)

जळगाव:- दिनांक 25 सप्टेंबर रोजी सिल्वर पॅलेस हॉटेल जळगाव येथे महाराष्ट्र फार्मसी ऑफिसर असोसिएशन जळगाव यांनी ग्लोबल मीटिंग ग्लोबल हेल्थ नीड्स. हे ब्रीदवाक्य घेऊन शासकीय सेवेतील औषध निर्माण अधिकारी यांच्या जिल्हा संघटनेने जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा केला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर होते. सुरुवातीला व्यासपीठ सर्व वरील मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजन केले. त्यानंतर संघटनेचे दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. रुग्ण सरकारी दवाखान्यात येतात त्या रुग्णांसाठी एकच फार्मासिस्ट असतो. औषधांचा योग्य डोस देणे व त्याचा फॉलोअप घेत राहणे. कधी कधी रुग्ण औषध घेण्याच्या चांगल्या मनस्थितीत नसतात, त्यावेळी त्यांना योग्य तो सल्ला देणे. फार्मासिस्टच्या गैरहजरीत म्हणजे रिक्त पदे, रजा, मीटिंग, ट्रेनिंग, जिल्हा लेव्हलवरून मेडिसिन आणणे अशा वेळेस अनेक प्रश्न तयार होतात, प्रशासन अशा गैरहजेसच्या वेळेस काही नियमावली तयार करणार आहे का? खरंतर दोन पदाची गरज असताना कोणत्याही प्रकारचा निर्णय होताना दिसत नाही आहे. उपकेंद्रांना सुद्धा फार्मासिस्टची गरज आहे. जिथे डॉक्टर तिथे फार्मासिस्ट आवश्यक आहे. शासकीय सेवेत डिप्लोमा डिग्री मास्टर डिग्री यांच्यासाठी एकच पद नोकरी साठी उपलब्ध आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारला स्वतंत्र औषधी संचालय सुरू करावे असे परिपत्रक दिले तरीही अजून कुठलीही कारवाई नाही केंद्र सरकारने फार्मसी ॲक्ट सर्व राज्यांनी लागू करावा असे अधिसूचना देऊनही अंमलबजावणी झालेली दिसत नाही. महाराष्ट्र फार्मसी कौन्सिलही याच्याकडे दुर्लक्ष करीत आहे. एका बाजूला नविन फार्मसी कॉलेज मान्यता देत आहे त्याप्रमाणे शासनाकडे नोकऱ्या उपलब्ध नाहीत. अशी यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश महाजन प्रस्तावना केली. यावेळी व्याख्याते प्रा.सचिन देवरे यांचे आसू आणि हसू व आरोग्य तसेच रविंद्र पाटील यांचे श्री छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे संघटन या विषयावर व्याख्यान झाले. जिल्हाध्यक्ष उमेश महाजन यांचा माजी राज्य सचिव दशरथ वाणी व यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आणि सेवानिवृत्त फार्मासिस्ट, संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मरणोत्तर फार्मसिस्ट यांचा परिवाराचा गुणगौरव सत्कार करण्यात आला.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर यांच्या अध्यक्षीय भाषणात आरोग्य क्षेत्रामध्ये औषधे योग्य वापर करणे अति आवश्यक आहे. अतिवापर हा आरोग्यास हानिकारक आहे त्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती कमी होत चालली आहे. औषध निर्माण अधिकारी यांच्या संबंधित प्रश्न शासन स्तरावर पत्रव्यवहार करून त्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल असे आश्वासन दिले. त्यानंतर प्रत्येक औषध निर्माता यांना काही सूचना दिल्या आपण आपल्या कार्यक्षेत्रात गोरगरीब लोकांना योग्य ते औषध देऊन लोकांना चांगली सेवा द्यावी, प्रत्येकाने प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन आपल्या नावाचे एक स्वतःचे झाड लावावे व त्याची निगा राखावी असे सांगून जागतिक फार्मसिस्ट दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. आभार प्रदर्शन विजय बडगुजर यांनी केले. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.सुधा बोरोले जिल्हा साथरोग अधिकारी, डॉ.बाळासाहेब वाबळे, जिल्हा साथरोग अधिकारी, औषध निर्माण अधिकारी संघटनेचे कार्याध्यक्ष सुधीर जगताप, सचिव संतोष जाधव, कोषाध्यक्ष मुकेश पाटील, उपाध्यक्ष संदीप पाटील व प्रियंका मंडावरे पंकज साळुंखे (सह कोषाध्यक्ष), मनोहर कोळी व संगीता पाटील (सहसचिव), परेश पाटील, सुरेश मराठे, युवराज रोकडे, मुरलीधर विसावे (सर्व सल्लागार), प्रशांत मराठे , गणेश साळुंखे, भास्कर पाचपांडे, नितीन गायकवाड, राजेंद्र चव्हाण, शेख अखिल अब्दुल शकूर(सर्व कार्यकारणी सदस्य), भावेश थोरात, नरेंद्र घुले,जाफर फारुकी, रवींद्र महाजन,मिलिंद पाटील, विलास बिऱ्हाडे, गजेंद्र निकम, अतुल पाटील, विजय खडके, शामकांत पाटील, विकास धुमाळ, रवींद्र पाटील, कौशल नेमाडे उपस्थित होते.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 5 1 4 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे