Breaking
जळगाव

गाडीचा पाठलाग करत, गोरक्षकानी वाचविले १३ म्हशींचे प्राण. 

0 7 5 7 9 1

उपसंपादक – कल्पेश महाले.

चाळीसगांव – धुळे येथून काही गोरक्षक बीड येथे कामानिमित्त जात असताना चाळीसगांव बायपास येथे एका मित्राची वाट बघत थांबले होते. तेथून त्यांना मालेगाव च्या दिशेने भरधाव वेगाने आयशर गाडी जातांना दिसली. चॉकलेटी रंगाची टाटा कंपनीची आयशर गाडी पूर्णपणे बंदिस्त होती पण त्या गाडीमधून गुरांचा आवाज येत असल्याने, त्या गाडीवर गोरक्षकांना संशय आल्याने त्यांनी लगेच त्या गाडीचा पाठलाग चालू केला. परंतु गाडीचा चालक भरधाव गाडी चालवत होता.

त्यामुळे समोरच काही ओळखीच्या असलेल्या गोरक्षकांनी मेहुनबारे येथील गोरक्षक मित्र यांना कॉल केले. त्यांनी लगेच पिलखोड येथे बोलविले, त्यांनी ती गाडी साकुर फाटा येथे थांबिवली आणि मेहूनबारे पोलीस स्टेशन येथे संपर्क करुन पोलीस घटनास्थळी आले. गाडीला पाठीमागून लाकडी फळ्या लावून बंदिस्त केली असताना गाडीत डोकावून बघितले असता तेरा लहान मोठ्या कळ्या रंगाच्या १३ म्हशी अमानुषपणे निर्दयतेने कोंबलेले दिसले.

सदरील गाडीचा चालक आबिद खान अकमल खान कुरेशी वय ४२ राहणार छोटी गुजरी चाळीसगाव व आसिफ खान अयुब खान वय ४३ सलीमनगर मालेगाव चालकाकडे गुरांचे खरेदी विक्रीचा परवाना बाबत विचारणा केली असता, त्यांच्याकडे कोणताही प्रकारचा खरेदी विक्रीचा परवाना नसले बाबतचे त्यांनी सांगितले असता, सदरील वाहन, म्हशी व त्यावरील चालकासह पो.हे.कॉ. नितीन सोनवणे आणि पो.कॉ. भूषण बाविस्कर यांनी ताब्यात घेऊन मेहूनबारे पोलीस स्टेशन येथे हजर केले.

वाहन क्रमांक एम.एच.४३ ई. ५६३० टाटा कंपनीची ९०९ चॉकलेटी कलरची गाडीसह, १३ म्हशी एकूण ४ लाख ४२ हजार रुपयांचा ऐवज पोलीसांनी जप्त करून १९६० कलम ११ (१) (ड), ११(१) ई, ६६, १९२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास स.फौ.श्री.मिलिंद शिंदे करीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 5 7 9 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे