
0
7
5
7
4
1
प्रतिनिधी कल्पेश महाले चाळीसगाव.
शासनाच्या कामाच्या नावाखाली इतर बांधकाम कामात कोणतीही परवानगी न घेताच ठेकेदार बिंदास वापरतात अवैधरित्या मुरूम.
मौजे तिरपोळे येथे अवैधरित्या मुरूम वाहतूक करणारे कल्थिया कंपनीचे नॅशनल हायवे चे काम सुरू आहे. काम चालू असताना MH-20 GC 0341 या क्रमांकाचे डंपर भर दिवसा दुपारी 3:47 वाजता महसून पथकाने जप्त केले. त्यावर चाळीसगाव महसूल पथक आणि मेहुनबारे पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यवाही करण्यात आली.
यावेळी मेहूनबारे मंडळ अधिकारी सुनिल पवार तलाठी पवन शेलार, तलाठी बागुल, तलाठी नयना ब्राम्हणे आणि मेहूनबारे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप परदेशी, सहाय्यक फौजदार मिलिंद शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल गोरख चकोर, निलेश लोहार, जितु परदेशी, उपास्थित होते.
0
7
5
7
4
1