धुळ्यातील देवपूर पोलीस ठाण्यातील हवालदार चार हजारांची लाच स्वीकारताना नाशिक एसीबीच्या जाळ्यात.

(उपसंपादक – कल्पेश महाले)
धुळे:- ओमनी गाडीवर सोडा विक्री करू देण्यासाठी व कायदेशीर कारवाई न करण्यासाठी चार हजारांची लाच मागून ती स्वीकारताना धुळ्यातील देवपूर पोलीस ठाण्याचे हवालदार एजाज काझी (वय ५२, पोलीस मुख्यालय, धुळे) यांना नाशिक एसीबीने लाच स्वीकारताच पोलीस ठाण्यातच अटक केली. या कारवाईने लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली.
असे आहे लाच प्रकरण
५० वर्षीय तक्रारदार हे देवपूर पोलीस ठाणे हद्दीत ओमनी गाडीवर सोडा विक्री करतात व हा व्यवसाय करू न देण्यासाठी व कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी हवालदार एजाज काझी यांनी चार हजारांची लाच मंगळवारी १५ ऑक्टोंबर २०२४ रोजी मागितली व तक्रारदाराने नाशिक एसीबीकडे तक्रार नोंदवली. लाच पडताळणी केल्यानंतर सापळा रचण्यात आला. देवपूर पोलीस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी तक्रारदाराकडून चार हजारांची लाच स्वीकारताच हवालदाराला रंगेहात अटक करण्यात आली व त्यांच्याविरोधात देवपूर स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केला सापळा यशस्वी
नाशिक पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, रिडर पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक एसीबीचे पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, हवालदार प्रभाकर गवळी, सुरेश चव्हाण आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.