खडकी बु. येथे स्व.पप्पूदादा गुंजाळ युवा फाऊंडेशन तर्फे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतनिमित्त व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न

उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगाव – तालुक्यातील खडकी बु येथे लोकनेते स्व.पप्पूदादा युवा फाऊंडेशन तर्फे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त युवा शिवव्याख्याते आकाश पाटील यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यावेळी प्राथमिक, माध्यमिक शाळेचे, शिक्षक मुख्याध्यापक, कर्मचारी, पोलीस पाटील विनायक मांडोळे, ग्रामपंचायत सदस्य विनोद पवार, सदस्या पुनम जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच या व्याख्यानाला गावातील ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. व युवा शिवव्याख्याते आकाश पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
हा व्याख्यानाचा कार्यक्रम पप्पूदादा युवा फाउंडेशनचे अध्यक्ष शुभम मांडोळे, प्रवीण जाधव, विजय पांगारे, वसंत आभाळे, गणेश कोल्हे, प्रल्हाद सावंत, गणेश पवार, पुंडलिक लोहके, योगेश चव्हाण, किशोर चव्हाण, नामदेव पालवे, दिग्विजय पाटील, विशाल मराठे, चेतन वायकर, हिम्मत मांडोळे, अमोल पवार, आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने उत्साहाने संपन्न झाला.