जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील वाळू माफिया वर एमपीडीए अंतर्गत कारवाई

जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील वाळू माफिया वर एमपीडीए अंतर्गत कारवाई
भडगाव प्रतिनिधी
भडगांव प्रतिनिधी:- जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील वाळू माफिया संजय सुरेश त्रिभुवन याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक आणि तस्करीवर आळा बसण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
संजय त्रिभुवन याच्याविरुद्ध पाचोरा आणि भडगाव पोलिस स्टेशनमध्ये एकूण सहा गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध भडगाव पोलिस स्टेशनमध्ये दोनदा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती.
भडगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर डॉमाळे, पोलीस कॉन्स्टेबल प्रविण परदेशी, संदिप सोनवणे, जितू राजपूत यांनी संजय त्रिभुवन याला अटक केली आणि त्याची मध्यवर्ती कारागृह नागपूर येथे रवानगी केली.
या कारवाईत पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील आणि त्यांचे सहकारी सहायक फौजदार युनुस शेख इब्राहीम व हे. कॉ. सुनिल दामोदरे यांनी सहकार्य केले.