अवैध मुरूम वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल पथकाकडून जप्त.

उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगाव – चाळीसगाव तालुक्यातील देवळी-बिलाखेड धरणातून बिलाखेड येथे दिनांक १६ सप्टेंबर २०२४ सोमवार रोजी दुपारी ३:४० वाजेच्या सुमारास मुरूम ( गौणखनिज ) वाहतूक करणारे MH 18 CV 8817 या क्रमांकाचे महिंद्रा कंपनीचे एक ट्रॅक्टर-एक ट्रॉली जप्त करण्यात आले. या पथकाने ट्रॅक्टर चालकाकडे मुरुम वाहतुक परवानगी विचारली असता सदरील टॅक्ट्रर चालकाकडे कोणतीही रॉयल्टीची परवानगी आढळून आली नसता फक्त नगरपरिषद कामासाठी गणपती विसर्जन कामे रस्त्यावर डाकडूजीकामी साठी टाकत आहेत तसेच न.पा./बांध./१०८५/२०२४ हे पत्र दिनांक २६/०७/२०२४ हे चे आहे. सदर ट्रॅक्टर चाळीसगाव नगरपरिषद कामासाठी चालू आहे असे टॅक्ट्रर चालकाने जबाब म्हटले आहे.
महसुल पथकाने एक ब्रास मुरुमसह महिंद्रा कंपनीचे एक ट्रॅक्टर,एक ट्रॉली पोलीस कवायत मैदान चाळीसगाव येथे जमा करुन पंचनामा रिपोर्ट तहसील कार्यालय येथे सादर केलेला आहे.महसुल पथकातील मंडळ अधिकारी गणेश लोखंडे, तलाठी विनोद पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
यावेळी चाळीसगाव तहसीलदार यांची प्रतिक्रिया घेतली असता चाळीसगाव महसुल विभागाकडे चाळीसगाव नगरपरिषदेकडून अधिकृत मुरुम रॉयल्टी भरणा केलेला नाही म्हणून सदरील कारवाई करण्यात आली आहे. यावेळी तहसीलदार प्रशांत पाटील म्हणाले.
या मुरुम टाकण्याच्या निविदेचा ( टेंडर ) चा चालु वर्षाचा भरणा नगरपरिषदेने चाळीसगाव महसूल विभागाकडे केव्हा भरला ? हे मुरुम टाकण्याची निविदा ( टेंडर )२०२४ चालू वर्षाचे केव्हा सुरु झाले ? असा प्रश्न शहरातील सुज्ञ नागरिकांमध्ये पडलेला आहे.
चाळीसगाव महसुल पथकाने अवैध गौणखनिज वाहतूक (वाळू, दगड, मुरुम ) बाबत संपूर्ण तालुक्यात व मुख्यतः शहरात कडक कारवाई कराव्यात अशी सुज्ञ नागरिकांकडून मागणी होत आहे.