
(उपसंपादक – कल्पेश महाले)
चाळीसगाव:- तालुक्यातील बहाळ येथील मेन चौकातील कुलस्वामिनी सारजा बारजा माता व पांडुरंग महाराज रथोत्सवा निमित्ताने कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून कुलस्वामिनी सारजा बारजा माता नवरात्र उत्सव मोठ्या उत्सवाहात सुरु आहे. दि. १२ रोजी दसरा निमित्य पांडुरंग महाराजांची पालखी सोहळा रात्री नऊ वाजता मंदिरातून निघणार आहे व मेन गल्ली तून बहाळ कसबे येथे जाणार आहे सकाळी दोन ते तीन वाजता पालखी परत मंदिरात येणार आहे .
दि १४ रोजी सायंकाळी चार वाजता रथाची मिरवणूक मेनरोड मार्गे सावता महाराज चौक ,सुतार गल्ली अशी निघणार आहे . सन १८३३ पासून सुरु असलेला कीर्तन सप्ताह सुरु करण्यात आला आहे यंदा सन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहेत कीर्तनाची सुरुवात दि.७ रोजी सुरु झाली. दि. ७ रोजी हभप परिमल महाराज ,सटाना दि ८ रोजी हभप प्रदीप महाराज ,पाचोरा दि ९ रोजी हभप संतोष महाराज शिंदाड यांचे कीर्तन सेवा संपन्न झाली. आणि दि.१० रोजी हभप प्रमोद महाराज धुळे, दि.११ रोजी चेतन महाराज मालेगाव दि १३ रोजी कैलास महाराज टेकवाडेकर दि १२ रोजी पालखी सोहळा दि १४ रोजी हभप कृष्णा महाराज पैठण यांची कीर्तन होणार आहेत तर दि.१५ रोजी सकाळी ९ ते ११ हभप कृष्णा महाराज, पैठण यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे त्या नंतर रथ उत्सव मानकरी व टाळकरी यांचा सन्मान करण्यात येणार आहे त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार तरी कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन मंदिर समितीने केले आहे.