Breaking
जळगावधुळेनंदुरबारनाशिकमहाराष्ट्र

वीज चोरी करणाऱ्या नागरिकांवर चाळीसगांव येथे महावितरणाची धडक कारवाई

0 7 5 1 9 4

उपसंपादक – कल्पेश महाले

चाळीसगांव – तालुक्यात व शहरात वीज वितरण कंपनीची चोरी करणाऱ्या बहादरांवर कारवाई करण्यास वीज वितरण कंपनीने सुरुवात केली आहे. ही विशेष वीज चोरी मोहीम वरिष्ठांच्या आदेशानुसार राबविण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता नितीन घुमरे यांनी दिली. जळगाव व चाळीसगाव वीज वितरण विभागाच्या एकूण ४० भरारी पथकांमध्ये २१६ अधिकारी व कर्मचारी सहभागी होते. या मोहिमेमध्ये तपासणी दरम्यान ७९९ वीज कनेक्शन चेक केले असता त्यामध्ये १६४ वीज कनेक्शन संशयास्पद आढळले. त्यानंतर ते १६४ वीज मीटर चेक केल्यानंतर १२० वीज मीटर मध्ये वीज चोरी आढळून आली आहे. या १२० वीज मीटर तपासणी केल्यानंतर वीज चोरी आढळल्यामुळे भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३७, १३८ प्रमाणे त्या वीज चोरांवर पुढील योग्य ती कारवाई सुरु केलेली आहे. यापैकी चाळीसगाव शहरात एकूण ४३ वीज चोऱ्या सापडल्या आहेत.

चाळीसगाव शहर व ग्रामीण भागात वीज वितरण कंपनीकडून विजेचा पुरवठा केला जातो. या विजेचा काही नागरिक कनेक्शन न घेता विजेची चोरी करतात. या वीज चोरी बहादरांवर कारवाई करण्यासाठी व वीज चोरीला आळा बसण्यासाठी महावितरण कंपनीने भरारी पथक नेमले आहेत. जळगांव व चाळीसगांव विभाग येथील महावितरणाच्या भरारी पथकाने चाळीसगांव शहरी व ग्रामीण भागात धडक कार्यवाही करीत दंडात्मक कडक कारवाई केली आहे.

या पुढे ही वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांवर महावितरण वीज चोरीला प्रतिबंध करणे कामी कडक कार्यवाही सुरु राहणार असल्याचे चाळीसगांव विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन घुमरे यांनी सांगितले.

3/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 5 1 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे