Breaking
जळगावधुळेनंदुरबारनाशिकमहाराष्ट्र

महामार्ग पोलीसांच्या सतर्कतेमुळे मोटरसायकलसह खोलदरीत पडलेल्या तरुणाचे प्राण वाचले

0 7 5 0 1 7

उपसंपादक – कल्पेश महाले 

चाळीसगांव – तालुक्यातील गोरख शिवराम राठोड वय ४८,  रा. शिवापूर तांडा ही व्यक्ती काल दि. ५ मार्चला दुपारी १.३० वाजेच्या सुमारास MH 52 A 1075 या मोटारसायकल वरून कन्नड घाट (औट्रम घाट) उतरत असतांना घाटातील मेणबत्ती पॉईंटजवळ त्याचा मोटारसायकलवरील ताबा गेल्याने तो ३०० फुट खोल दरीत मोटारसायकलसह कोसळला. या अपघातात त्याच्या हातापायाला व डोक्याला गंभीर मार लागला होता. या अपघाताची माहिती मिळताच चाळीसगांव महामार्ग पोलीस विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिष पाटील व त्यांचे सहकारी हवालदार योगेश पवार, शेषराव राठोड, संदिप जगताप हे तातडीने घटनास्थळी पोहोचले.

या सर्वांनी खोल दरीत उतरून जखमी राठोडला अक्षरश: खांद्यावर उचलून दरीतून वर आणले आणि नंतर त्याला एका खासगी रुग्णवाहिकेत टाकून शासकीय रूग्णालयात उपचारार्थ रवाना केले.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 5 0 1 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे